“सुंदर आयोजन बरोबरच चमकदार खेळाडू घडले पाहिजेत” ; संदेश सावंत
खारेपाटण (प्रतिनिधी) : शिक्षकांनी एकदा मनावर घेतले. तर ते काही करू शकतात.याच उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या स्पर्धा बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार क्रीडा महोत्सव स्पर्धेच्या सुंदर आयोजन बरोबरच राज्य व देश पातळीवर उत्तम कामगिरी दाखवणारे चमकदार असे गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत असे भावपूर्ण उदगार सिंधुदुर्ग जि.प.चे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी कणकवली तालुक्यातील वारगाव या गावी आयोजित करण्यात आलेल्या तळेरे प्रभाग स्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना काढले.
माजी जि.प.बांधकाम व वित्त सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घघाटन संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाला नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे या शाळेचे चेअरमन मनोज गुळेकर, माजी जि.प.सदस्य सुरेश ढवळ, संजय देसाई, माजी पं.स.सभापती प्रकाश पारकर, माजी जि.प.महिला बाल कल्याण सभापती रत्नप्रभा वळंजू, वारगाव सरपंच नम्रता शेट्ये,उपसरपंच नाना शेट्ये, खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, वारगाव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास तळेकर, यांसह शिक्षण विस्तार अधिकारी प्रभाग तळेरे कैलास राऊत, माजी विस्तार अधिकारी सुहास पाताडे, वारगाव प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरीक बबनशेठ केसरकर, तसेच युवा उद्योजक तेजस जमदाडे, सागर डंबे, कुरंगवने सरपंच पप्पू ब्रम्हदंडे, खारेपाटण केंद्र शाळेचे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे तसेच केंद्रप्रमुख संजय पवार, गोपाळ जाधव व खारेपाटण नं.१ केंद्र मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर, साळीस्ते केंद्रप्रमुख सत्यवांन घाडीगावकर, शेर्पे केंद्रप्रमुख दशरथ शिंगारे, कासार्डे केंद्रप्रमुख आनंद तांबे, तळेरे प्रभाग बीट मुख्याद्यापक महेंद्र पावसकर तसेच वारगाव शाळा क्र.२ च्या अध्यक्ष अर्चना नावळे, वारगाव शाळा क्र.३ चे अध्यक्ष किशोर मांडवकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी वारगाव शाळा नं.१च्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवण व स्वागत गीत गायन करून पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व क्रीडा स्पर्धेचे उद्घघाटक संदेश सावंत यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र जठार तसेच वारगाव ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विचारपिठवरील सर्व मान्यवरांच्या कार्यक्रमाचे आयोजक व वारगाव गावचे उपसरपंच नाना शेट्ये यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना संदेश सावंत पुढे म्हणाले खारेपाटण विभागात कार्यक्रमाला येत असताना आमचे मित्र स्वर्गीय बाळा वळंजू यांची नेहमीच आठवण येते.त्यांच्या कार्यकर्तृत्वणे आम्ही प्रेरित झालो होतो.हा विभाग विकासामध्ये जिल्हयात नं.१ राहण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.त्यांचे प्रती आदरयुक्त काम आपण सर्वांनी करूया असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र जठार यांनी नामदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली जिल्हा परिषद सिंधुदुर्गात बसली. व त्यावेळी सुरू केलेला जिल्हा परिषदेचा पहिला प्रमुख उपक्रम म्हणून बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार हा क्रीडा महोत्सव सुरू करण्यात आला.व आजपर्यंत अविरतपणे सुरू आहे.यावेळी प्रमुख पाहुणे मनोज गुळेकर यांनी देखील विद्यार्थ्यांना खेळा विषयी मार्गदर्शन करून शुभेछा दिल्या.
या स्पर्धेची सुरवात कासार्डे जि.प.माजी सदस्य संजय देसाई यांच्या शुभहस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आली. तर या स्पर्धेमध्ये कब्बडी, खो-खो, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, थाळी फेक, ५०/१००/२०० मिटर धावणे फोर रीले स्पर्धा तसेच समूह गांन व समूह नृत्य आदीचा समावेश या क्रीडा महोत्सवात करण्यात आला होता. क्रीडा प्रमुख प्रवीण कुबल सर व उपक्रिडा प्रमुख श्रीराम विभुते व त्यांचे प्रभागातील सर्व सहकारी शिक्षक वर्ग यांनी क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत विभुते यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ही शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत यांनी केले शेवटी सर्वांचे आभार वारगाव शाळा नं.१ च्या मुख्याध्यापिका रेखा लांघी यांनी मानले.