देवगड तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध फेरनिवड

कार्यकारणीही बिनविरोध फेरनिवड ; निवड जाहीर होताच पत्रकारांचा एकच जल्लोष

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध फेरनिवड झाली असून तालुका कार्यकारणीचीही बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.

देवगड तालुका पत्रकार समितीची निवडणुक प्रक्रिया डायमंड हॉल येथील सभागृहात निवडणुक निरिक्षक महेश सरनाईक आणि महेश रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.या निवडणुकीमध्ये उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने अयोध्याप्रसाद गावकर यांनी बिनविरोध निवड केली असून कार्यकारणीमधील उपाध्यक्षपदी दयानंद मांगले, अनिल राणे, सचिवपदी सचिन लळीत, खजिनदारपदी श्रीकृष्ण रानडे, सहसचिवपदी महेश तेली आणि कार्यकारणी सदस्य म्हणून प्रशांत वाडेकर, सुरज कोयंडे, संतोष कुळकर्णी, गणेश आचरेकर व राजेंद्र साटम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडणुकीला जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेंद्र मुंबरकर , राजू पडवळ, साईनाथ गावकर, विश्वास मुणगेकर, शंकर मुणगेकर, संतोष साळसकर, प्रदीप घाडी, स्वप्नील लोके, दिनेश साटम, वैभव केळकर, बी.के.चव्हाण आदी उपस्थित होते.

अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध फेरनिवड जाहीर होताच त्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी नुतन अध्यक्ष अयोध्याप्रसाद गांवकर यांनी आपली अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड केल्याबद्दल सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त करून देवगड तालुका हा वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा पोंभुर्ले ही जन्मभुमी असलेला तालुका असून देवगड तालुका पत्रकार समितीने संपूर्ण कार्यकारणीची एकमताने बिनविरोध निवड केल्याबद्दल आभार व्यक्त करून पत्रकार सहकाèयांनी आपल्यावर पुन्हा दिलेली अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सार्थकी लावून देवगड तालुका पत्रकार समिती पुढील दोन वर्षात सर्वांच्या सहकार्याने आदर्शवत काम करेल असा विश्वास व्यक्त केला.यावेळी निवडप्रक्रियेला उपस्थित राहीलेल्या निवडणुक निरिक्षक महेश सरनाईक व महेश रावराणे यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!