शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कुडाळ येथे बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

कुडाळ (प्रतिनिधी) : शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कुडाळ शिवसेना शाखा येथे उत्साहात करण्यात आली. सकाळी शिवसेना कुडाळ शाखा येथे जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर कुडाळ सरकारी रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप आणि युवती सेने मार्फत बेडशीट वाटप करण्यात आले . तसेच कुडाळ शिवसेना शाखा येथे संध्याकाळी ४ वाजता हळदी कुंकू महिला आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे .

यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत , तालुका प्रमुख राजन नाईक , तालुका संघटक बबन बोभाटे , उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी ,शहर प्रमुख संतोष शिरसाट ,उपशहर प्रमुख गुरु गडकर , माजी जी.प.अध्यक्ष विकास कुडाळकर , उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट , ओ .बी.सी सेल शहर प्रमुख शेखर उर्फ राजू गवंडे , युवासेनेचे सुशील चिंदरकर , युवासेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर , युवासेना शहर समन्वयक अमित राणे , युवती सेना तालुका प्रमुख तेजस्वी परब , नगरसेवक किरण शिंदे , उदय मांजरेकर , नगरसेविका श्रेया गवंडे ,श्रुती वर्दम ,सई काळप ,ज्योती जळवी , सतीश कुडाळकर , धीरेन उर्फ गोट्या चव्हाण , रुपेश कांबळी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!