तुळसुली तर्फ माणगाव येथील ठाकरे शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश

तुळसुली येथे ठाकरे गटाला खिंडार

कुडाळ (प्रतिनिधी) : तुळसुली तर्फ माणगाव येथील ग्रामपंचायत माजी उपसरपंच व ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी विजय वारंग यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसमवेत भाजपात प्रवेश केला. भाजपाचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला. याप्रसंगी श्री. राणे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. दरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा भाजपात झालेला प्रवेश ठाकरे शिवसेनेला धक्का मानला जात आहे.

यावेळी श्री. वारंग यांच्या सोबत उप शाखाप्रमुख हरिश्चंद्र माईंनकर, बूथ प्रमुख शिवराम वारंग, बूथ प्रमुख शशिकांत नाईक, शाखा प्रमुख राजन सहदेव वारंग, शाखा प्रमुख महेश वेंगुर्लेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य श्वेताली नाईक, मनोहर वारंग, संतोष तुळसुलकर, माधवी माईंनकर, प्रशांत तुळसुलकर, संजना वेंगुर्लेकर, बंड्या वारंग, श्रीकृष्ण धुरी, एकनाथ वारंग, महेश मेस्त्री, जयराम वारंग, विजय वारंग, भिकाजी जाधव, महेश वारंग, प्रणील वारंग, रमेश वारंग, अरविंद वारंग, सुमित मेस्त्री, कांचन सावंत, साई चव्हाण, धनंजय वारंग, बाबू वारंग, सुभाष वारंग, सुरेश वारंग, प्रमोद वारंग आदी कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी अँड. विवेक मांडकुलकर , प्रकाश मोर्ये , रूपेश कानडे , श्रीपाद उर्फ पप्या तवटे , दादा साईल आदि पदाधिकारी व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!