नगराध्यक्ष समीर नलावडे विरोधी गटनेते सुशांत नाईक यांच्यात खडाजंगी

रेल्वे स्टेशन रोडवरील रस्ता खचल्याचे निमित्त

ठेकेदार जावेद शेख शिवसेना शहरप्रमुख उमेश वाळकेंच्या अंगावर गेला धावून

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरांमध्ये रेल्वे स्टेशन रोडवर काही दिवसापूर्वीच गटाराचे काम करून पूर्ण झाले होते. त्यावर भराव टाकून रस्ता करण्यात आला होता. तो रस्ता सकाळी मोठी पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पुन्हा खचला यावेळी तत्परतेने कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांची टीम पोहोचली व  काम चालू केले त्याचवेळी  विरोधी नगरसेवक सुशांत नाईक ,शिवसेना शहर प्रमुख उमेश वाळके ,तेजस राणे, नगरसेवक कन्हैया पारकर हे देखील उपस्थित झाले  उमेश वाळके यांनी काम थाम्बवा काय करतात  असे विचारले असता ठेकेदार जावेद शेख यांनी त्यांच्या अंगावर धावून गेल्याने मोठी बाचाबाची झाली त्यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे व नगरसेवक सुशांत नाईक यांनी मध्यस्थी करून दोघांनाही बाजूला केले. या दरम्यान सुशांत नाईक व नगराध्यक्ष यांच्यातील खडाजंगी झाली त्यावेळी या कामासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना देखील जाब विचारणार असल्याचे सुशांत नाईक यांनी सांगितले 

कणकवली नगरपंचायत ने रेल्वे स्टेशन परिसरात गटासाठी खोदलेला रस्ता काम झाल्यानंतर भराव टाकून पूर्वत करण्यात आला पण आज सकाळी आठच्या सुमारास या रस्त्या खचून कणकवली शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यावर रस्ता पुन्हा खचला आणि मोठा अनर्थ टाळला असे नगरसेवक कन्यया पारकर यांनी सांगितले 

  विरोधी नगरसेवक तसेच सत्ताधारी नगरसेवक येथे दाखल झाले यावेळी काम निकृष्ट करत असल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला यावेळी सत्ताधारी नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी कडाडून विरोध करत निवडणुकीच्या तोंडावर राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप केला व कामास तत्परतेने सुरुवात करत लवकरात लवकर पाईपलाईन दुरुस्त करून कणकवली शहरासाठी पाणीपुरवठा करणार असल्याचे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सांगितले 

 यादरम्यान ठेकेदार जावेद शेख हे उमेश वाळके यांच्या अंगावर धावून गेले असता त्यांना थांबवण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे व सुशांत नाईक यांनी मध्यस्थी  केली व प्रकरण मिटवले  यावेळी दोघांमध्ये जोरदार बाचाबाची  झाली यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे नगरसेवक संजय कामतेकर बाबू गायकवाड , कन्हैया पारकर ,तेजस राणे नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!