पंचशील विकास मंडळ खारेपाटण यांचा उपक्रम
खारेपाटण (प्रतिनिधी): भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संतूक्त विद्यमाने जि.प.शालेय विद्यार्थ्यां करीता घेण्यात आलेल्या भव्य रंगभरण व निबंध स्पर्धेचा शुभारंभ आज जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष तथा पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी जि.प.केंद्र शाळेच्या माता पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रियंका गुरव,समिती सदस्य समीक्षा शेट्ये, प्राप्ती कट्टी शाळेचे मुख्यद्यापक प्रदीप श्रावणकर, संघमित्रा महिला मंडळ खारेपाटणच्या अध्यक्षा आंकांशा पाटणकर,सचिव – आरोही पाटणकर,उपाध्यक्षा दिपाली पाटणकर, पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे उपाध्यक्ष जितेंद्र कदम,खजिनदार – संदीप पाटणकर,धीरज जुमलेकर टाकेवाडी जि.प.शाळेच्या शिक्षिका झगडे , हसोळ टेंभ कोंडवाडी जि.प.शाळेचे शिक्षक कासार सर आदी माण्यवर उपस्थित होते.
प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रवाणकर सर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्व मान्यवराचे स्वागत शाळेच्या पदवीधर शिक्षिका अर्चना तळगावकर यांनी केले.इयत्ता २ री ते ४ थी च्या विद्यार्थ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रेखीव चित्र रंगभरण स्पर्धेसाठी देऊन त्यावर स्पर्धा घेण्यात आली. तर इयत्ता ५ वी ते ७ वी विद्यार्थ्यासाठी “माझा आवडता नेता डॉ.बाबसाहेब आंबेडकर ” या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. दोन्ही स्पर्धा मध्ये सुमारे १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य आणि त्यांचे समतेचे विचार घराघरात पोहचविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून केले असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी यावेळी सांगितले. “तर खारेपाटण येथील पंचशील विकास मंडळाच्या वतीने सामाजिक,क्रीडा, कला याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे चांगले शैक्षणिक उपक्रम देखील दरवर्षी हे मंडळ राबवत असल्याचे भावपूर्न उदगार केंद्र शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर यांनी यावेळी व्यक्त करून मंडळाचे आभार व्यक्त केले. तर या स्पर्धेतील विजेत्या गुणवंत स्पर्धकांचां सत्कार समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी दीं.१४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता “बुद्धविहार” पंचशील नगर खारेपाटण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे पंचशील विकास मंडळ खारेपाटणच्या वतीने सगण्यात आले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेच्या पदवीधर शिक्षिका अर्चना तळगावकर यांनी मानले.