सिंधुदुर्गात 13 ते 15 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची, गारा पडण्याची, विजा चमकण्याची व 45 ते 55 किमी प्रती तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. दिनांक 14 एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची व गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व 30 ते 40 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी.असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग करण्यात आले आहे.

error: Content is protected !!