खारेपाटण (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक व अभिंनंदन केले जात आहे.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व जुनिअर कॉलेज खारेपाटण मधील इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी या दोन वर्गातील एकूण २९ विद्यार्थी या गणित संबोध परीक्षेला बसले होते या परीक्षेचा विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून इयत्ता पाचवीतील रुद्र राजू गरजे या विद्यार्थ्यांने १०० पैकी १०० गुण संपादन केले आहेत. तसेच अर्णव प्रवीण कासार या विद्यार्थ्यांने ९८ गुण मिळवले. तर अभिनव लक्ष्मीकांत हरियाण या विद्यार्थ्यांने ९६ गुण मिळवले. रेवन अनंत राऊळ या विद्यार्थ्याने ९४ गुण मिळवले. तसेच प्रशालेतील सर्व २९ विद्यार्थी या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सेक्रेटरी महेश कोळसुलकर, खजिनदार संदेश धुमाळे तसेच सर्व संचालक मंडळ, तसेच प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.