कलमठ मध्ये मासे विक्रेत्यांची मुजोरी ; ग्रा पं कर्मचाऱ्यालाच केली मारहाण

कणकवली (प्रतिनिधी): कलमठ मध्ये मासे विक्रेत्यांची मुजोरी वाढली असून मच्छी मार्केट ऐवजी रस्त्यावर बसून मासेविक्री करणाऱ्या महिलेने ग्रा पं कर्मचाऱ्यालाच मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे.कलमठ मध्ये सुसज्ज मच्छी मार्केट असतानाही काही मासे विक्रेते पोलीस स्टेशन पासून ते लक्ष्मी चित्रमंदिर पर्यंत रस्त्यालगत बसून मासेविक्री करतात.याचा त्रास वाहनचालकांना होत वाहतूक कोंडी होते.तसेच लगतच्या परिसरात दुर्गंधीही होते. आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कलमठ ग्रा पं चा कंत्राटी कर्मचारी गौरव तांबे यांनी साफसफाई करत असताना मच्छी मार्केट बाहेर बसलेल्या मच्छी विक्रेती महिलेला अटकाव केला. तेव्हा संशयित आरोपी सपना राजू शिरसाट या महिलेने गौरव तांबे याला शिवीगाळ करून हाताच्या थापटाने मारहाण केली. या घटनेनंतर सरपंच संदीप मेस्त्री, ग्रामविकास अधीकारी प्रवीण कुडतरकर,ग्रा पं सदस्य नितिन पवार, श्रेयस चिंदरकर, ग्रामस्थ स्वरूप कोरगावकर, समर्थ कोरगावकर, सोमनाथ पारकर, वरिष्ठ सहाय्यक दीपक गुरव, खुशाल कोरगावकर, मंगेश कदम, रूपेश कदम, मोहन कदम, प्रतीक उकर्डे यांनी गौरव तांबे सह पोलीस पाहणे गाठत मारहाण करणाऱ्या मच्छी विक्रेत्या महिलेविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तांबे यांच्या तक्रारीनुसार संशयित आरोपी सपना राजू शिरसाट विरोधात भा दं वि 323, 504 नुसार उअदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!