कणकवली नगरपंचायतला मिळालेला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक कणकवली वासीयांना समर्पित – नलावडे, हर्णे

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणेंनी दिलेल्या विकासनिधीमुळे झाला कणकवलीचा विकास

कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस , सभापती राहुल नार्वेकर तसेच प्रधान सचिवांच्या हस्ते कणकवली नगरपंचायतचा नगरविकास दिनी राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार कणकवली शहरवासीयांना समर्पित करत आहे. सन 2022 – 23 सालमध्ये शहरविकासासाठी केलेले नवीन रिंगरोड, कोव्हीड काळात केलेले उत्कृष्ट काम, स्वछता, आरोग्य, शासनाचे विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबविले, प्रशासकीय पातळीवरील करवसुली, बालोद्यान आदी बाबी लक्षात घेत राज्य शासनाकडून नगरपंचायत गटामध्ये कणकवली नगरपंचायत ला प्रथम क्रमांकाने सन्मानित केलेलं आहे. हा सन्मान समस्त कणकवलीवासीयांचा आहे, अशी भावना नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना नलावडे, हर्णे म्हणाले की आमदार नितेश राणे यांनी वेळोवेळी उपलब्ध करून दिलेला विकास निधीमुळे हा सन्मान मिळाला आहे.सर्व सहकारी नगरसेवक, नगरपंचायत चे मुख्याधिकारी अवधूत तावडे, अधिकारी व कर्मचारी यांचाही या यशात वाटा आहे.कणकवली शहराच्या दृष्टीने हा सुवर्णक्षण आहे. यापुढे विकासकामांमध्ये अव्वल राहून कणकवली नगरपंचायत चा झेंडा राज्यात फडकत ठेवणार असल्याचेही नगराध्यक्ष नलावडें म्हणाले. यावेळी गटनेते संजय कामतेकर, बांधकाम सभापती ऍड. विराज भोसले, नगरसेवक बाबू गायकवाड, नगरसेविका मेघा गांगण,माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!