मनोज प्रकाश हडकर पुरस्कृत वेसरोत्पत्ती नावाचा दशावतार नाट्य प्रयोग होणार सादर
आचरा (प्रतिनिधी) : चिंदर भगवती माऊली यात्रोत्सव मोठ्या थाटात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे. आज रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी यात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी श्री भवानी रामेश्वर डंपर सर्विसचे मनोज हडकर पुरस्कृत दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग “वेसरोत्पत्ती” रात्रौ १० वाजता सादर होणार असून या नाट्य प्रयोगाचा रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मनोज प्रकाश हडकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.












