खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग समाजकल्याण विभागाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या कणकवली तालुक्यातील कुरंगावणे या गावातील बौद्धवाडी स्मशान शेड बांधणे या कामाचा शुभारंभ नुकताच जि. प. सदस्य प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. याप्रसंगी भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर, पं. स. सदस्य राजेश जाधव, भाजप शक्ती केंद्र प्रमुख शैलेश सुर्वे, तळेरे विभाग प्रमुख बबलू पवार, कुरंगावणे सरपंच संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे, साळीस्ते माजी उपसरपंच उदय बारस्कर, खारेपाटण ग्रा. पं. सदस्य किरण कर्ले, कुरंगावणे ग्रा. पं. सदस्य विशाखा राऊत, ग्रामस्थ महेंद्र कदम, ग्रामस्थ रवींद्र गोठणकर, संतोष पाष्ट्ये, प्रभाकर गोठणकर, मोतीराम मांडवकर, उद्देश रामाणे, दिगंबर गोसावी, आत्माराम गोसावी, ग्रा. पं. कर्मचारी राजेंद्र लाड, अंकुश सादिकले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने सदर स्मशानभूमी शेड बांधणी करण्यासाठी सुमारे ३ लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला असून कुरंगवणे बौद्धवाडी येथील ग्रामस्थांची गेली अनेक वर्षे असलेली मागणी अखेर यानिमित्ताने पूर्ण होणार आहे.












