खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या माध्यमातून व भाजप कणकवली तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या साळीस्ते गावातील कांजिरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच साळीस्ते बौध्दवाडी हायवे ते बुरंबावडे गावाकडे जाणाऱ्या या दोन्ही रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य राजेश जाधव, सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कांबळे, गिरीश कांबळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुरेश साळीस्तेकर, ग्रामसेवक विशाल वरवडेकर, प्रेमानंद कुळकर्णी, दिवाकर कुळकर्णी, बूथ अध्यक्ष चंद्रकांत हरयाण, मयुरेश लिंगायत, हिंमतराव कांबळे, श्रीहरी कांबळे, विजय कांबळे, प्रकाश कांबळे, चंद्रकांत रांबाडे, महेश गुरव, ठेकेदार मयूर चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.












