महिलांसाठी चांगले काम कर

निलम राणेंचा महिला बालविकास सभापती अनुराधा नारकर यांना मौलिक सल्ला

खासदार नारायण राणेंसह नीलम राणेंची पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत अनुराधा नारकर यांनी घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : महिलांसाठी चांगले काम कर. सभापतीपदाच्या माध्यमातून जनतेला न्याय दे अशा शब्दांत अवघ्या कोकणच्या वहिनीसाहेब निलम राणे यांनी जिल्हा परिषद महिला बालविकास सभापती अनुराधा नारकर यांना मौलिक सल्ला दिला. तसेच खासदार नारायण राणे यांनीही आपल्या कामाचा ठसा जनतेच्या मनात उमटेल असा कारभार करण्याचा सल्ला सभापती नारकर यांना दिला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला बालविकास सभापती बिनविरोध निवड झाल्यानंतर सभापती अनुराधा नारकर यांनी प्रथमच खासदार नारायण राणे यांच्यासह नीलम राणे यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर सदिच्छा भेट घेत आशीर्वाद घेतले. सभापती अनुराधा नारकर यांनी विनम्रपणे राणे कुटुंबियांचे सभापतीपदी निवड केल्याबद्दल आभार मानले. राणे कुटुंबियांना अपेक्षित काम करणार अशी ग्वाहीही दिली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळ खडपे, भाजपा पडेल मंडल अध्यक्ष महेशकुमार उर्फ बंड्या नारकर, नारकर यांची सुकन्या आर्या, जि. प. सदस्य प्रमोद रावराणे, भाजपा वैभववाडी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, बापू जुवाटकर, ज्ञानेश्वर खवळे, शाम रामाणे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!