संदीप चौकेकर मित्रमंडळ व प्रवीण तांबे मित्रमंडळ यांच्या वतीने ‘एक गाव एक संघ’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

विजेत्यांना लाखोंची बक्षिसे जाहीर

महाराष्ट्र आणि गोवा राज्य मर्यादित स्पर्धा रंगणार 15 ते 19 एप्रिल दरम्यान

कणकवली (प्रतिनिधी) : संदीप चौकेकर मित्रमंडळ व प्रविण तांबे मित्रमंडळ, शिरवल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक गाव एक संघ’ महाराष्ट्र आणि गोवा राज्य मर्यादित भव्य खुल्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक १५ एप्रिल ते १९ एप्रिल दरम्यान रंगणार असून, या स्पर्धेमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत आकर्षक बक्षिसांची रेलचेल असणार आहे. प्रथम क्रमांकासाठी तब्बल १,००,००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५१,००० रुपये, तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी १५,००० रुपये रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे. विजेत्या संघांना आकर्षक चषक मिळणार असून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना देखील विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी प्रवेश फी ₹१२,००० ठेवण्यात आली असून, प्रथम नोंदणी करणाऱ्या १६ संघांना प्रवेश दिला जाणार आहे. सर्व सामने लीग पद्धतीने खेळवले जातील. प्रत्येक गटातून एक संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. संघ नोंदणीसाठी ८ एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी प्रविण तांबे (९४२२८१२२४१), संदेश तांबे (९०४९५९९८३९), अविनाश कदम (७०२००८०२६०) व अनिप सावंत (९६३७०९८३६७) यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!