खा. नारायण राणे आणि नीलम राणे यांचा जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत यांना मौलिक सल्ला
जि. प. अध्यक्ष कामत यांनी खा. राणे दाम्पत्याची भेट घेत घेतले आशीर्वाद
बांदा (मंगल कामत) : प्रमोद… सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून चांगला कारभार कर. चार वर्षानंतर जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधिंचा कारभार सूरु झालाय. जिल्हावासीयांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. तुमच्या कामातून त्यांचे समाधान कर असा मौलिक सल्ला खासदार नारायण राणे आणि नीलम राणे यांनी नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांना दिला. जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आज खासदार नारायण राणेंसह नीलम राणे यांचीही कणकवली येथे ओम गणेश बंगल्यावर सदिच्छा भेट घेत राणे दाम्पत्याचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी खा. राणे यांच्यासह नीलम राणे यांनीही कामत यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. प्रमोद कामत यांचे राणे कुटुंबाशी असलेले अत्यंत जवळकीचे संबंध सर्वश्रुत आहेत. राणेंचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून प्रमोद कामत यांची ओळख आहे.












