कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात अवैध गौणखणीज चा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. वाळू 18 ते 20 हजार रुपये अडीच ब्रास साठी मोजावे लागत आहेत.कालावल खाडीत अवैध वाळू उत्खनन जोरात सुरू आहे. तेथील मंडळ अधिकारी आणि तलाठी काय करतात ? असा सवाल मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला.मागील वर्षी कासार्डे येथील अवैध सिलिका माईन्स बाबत आवाज उठवल्या नंतर दंड झाला आणि दंड वसुली प्रक्रिया सुरू आहे. इटीएसप्रमाणे मायनिंग ची मोजणी करण्याची मागणी करूनही अद्याप तशी मोजणी झालेली नाही.अवैध सिलिका उत्खनन , चिरे, वाळू वाहतूक करणाऱ्या 200 हुन अधिक गाड्याची फोंडाघाटातून वाहतूक होत आहेत. आंबोली घाटातून अवजड वाहतुकीला बंदी असूनही 12 टायर च्या गाड्यातून चिरे वाहतूक होत आहे.या ठिकानी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची आमची मागणी आहे.या ठिकाणी आर्थिक साटेलोटे करून पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक सुरू आहे. त्यामुळे शासनाचा 50 ते 100 कोटींचा महसूल बुडाला आहे. याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास हरित लवादाकडे तक्रार करणार असल्याचे उपरकर यांनी सांगितले.