आचिर्णे येथील रस्ते विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार नितेश राणे यांचे प्रतिपादन
वैभववाडी (प्रतिनिधी) : गावच्या विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत
आहे.अनेक विकास कामे देखील मार्गी लागली आहेत. आता पुढची यादी तयार ठेवा. विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. परंतु गावात भाजपा अधिक बळकट करणे ही तुमची जबाबदारी आहे. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.
आचिर्णे येथील पाच रस्ते विकास कामांचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते पार पडला.आचिर्णे मधलीवाडी रस्ता डांबरीकरण करणे – 5 लाख, आचिर्णे सिद्धाचीवाडी रस्ता डांबरीकरण – 5 लाख, आचिर्णे तेलीवाडी रस्ता 5 लाख, आचिर्णे – अरुळे रस्ता खडीकरण डांबरीकरण – 10 लाख, आचिर्णे कडूवाडी रस्ता 10 लाख, या रस्ता कामांचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते पार पडला. नितेश राणे म्हणाले, आठ वर्ष आपण सर्वजण सोबत राहीलात. कोणतीही तक्रार केली केली. निधीची तक्रार केली नाही. आज तुमचा आमदार सत्तेत आहे. आता जे मागाल ते तुम्हाला मिळणार. पुढची यादी तयार ठेवा. भरघोस निधी देण्याची जबाबदारी माझी असे सांगितले.
गावात स्वयंघोषित नेते आहेत. ते राज्य पातळीचे नेते आहेत. परंतु ते ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतः च्या भावाला निवडून आणू शकत नाही. त्यांच्याकडून तुम्ही विकास कामाची अपेक्षा करू नका असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.ग्रामपंचायत कार्यालय येथे आमदार नितेश राणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासिर काझी, माजी उपसभापती भालचंद्र साठे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, सरपंच रुपेश रावराणे, जयसिंग रावराणे, सुशील रावराणे, मोहन रावराणे, उत्तम सुतार, सुरेंद्र रावराणे, संतोष रावराणे, वासुदेव रावराणे, कृष्णा बुकम, आदेश रावराणे, स्वप्नील दरडे व भाजपा पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.