सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५० विद्यार्थ्यांचा सहभाग
जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग नगरी येथे २५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर निवासी कॅम्पचे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : 58 महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. चा 25 नोव्हेंबर ते 4 डिसेबर 2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग नगरी येथे निवासी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील 250 मुली मुले सहभागी झाले आहेत. या शिबिरात व्हेपन प्रशिक्षण, फायरिंग प्रशिक्षण, ड्रिल प्रशिक्षण, हेल्थ आणि हायजीन प्रशिक्षण, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, फायर फायटिंग, प्राकृतिक आपदा प्रशिक्षण, झुंबा, योगा प्रशिक्षण तसेच 100 मी. 200 मी धावणे, गोळफेक, कबड्डी, खो-खो, व्होलीबॉल इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या कॅम्पचे आयोजन समादेशक अधिकारी कर्नल दिपक दयाल सेनामेडल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सुभेदार मेजर दिनेश गेडाम, लेफ्टनंट सुनेत्रा ढेरे स. ह. केळकर महाविद्यालय देवगड, थर्ड ऑफिसर संदेश तुळसणकर अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी. थर्ड ऑफिसर शोभा गावडे खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल बांदा सावंतवाडी यांनी मार्गदर्शन केले.