वैभववाडी बौध्द सेवा संघ व सिंधुरक्त मित्र सिंधुदुर्ग प्रतिष्ठान यांनी सामाजिक बांधिलकी जपली
वैभववाडी (प्रतिनिधी) : ७५ व्या संविधान दिनानिमित्त वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व सिंधुरक्त मित्र सिंधुदुर्ग प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीरात २५ रक्त दत्त्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. वैभववाडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन संघांचे अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई अध्यक्ष यशवंत यादव, संजय जाधव, सुभाष कांबळे, रवींद्र पवार, शारदा कांबळे, शरद कांबळे, संतोष कदम, दिलीप यादव,रुपेश कांबळे, प्रफुल्ल जाधव यांच्यासह सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान शाखा देवगडचे प्रकाश जाधव, जिल्हा सदस्य महेश शिरवाडकर, वैभववाडी कार्याध्यक्ष शेखर रावराणे, एस एस पी एम ब्लड पडवेचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी खांबाळे गावचे सुपुत्र सत्यवान वासुदेव सुतार यांनी १७ वे रक्तदान करीत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांचे यावेळी सर्वांनी कौतुक केले. तसेच तालुका संघ व रक्तपेढीच्यावतीने सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.












