नवीन कुर्ली येथे नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गा युवा मंडळाकडून विविध कार्यक्रम

दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करुन सलग २४ व्या वर्षी कार्यक्रमांचे आयोजन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली फोंडाघाट येथे नवदुर्गा युवा मंडळाकडून भवानी मैदानावर सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त देवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करुन शारदीय नवरात्रारंभ रविवार दि.११ ऑक्टो. २०२६ ते विजयादशमी दसरा मंगळवार दि.२० ऑक्टो. २०२६ या कालावधीत विविध सांस्कृतिक, धार्मिक, तसेच सामाजिक उपक्रमाने कार्यक्रम साजरा होणार आहे.

यामध्ये रविवार दि.११ऑक्टो. सकाळी १०.०० वा. देवीचे आगमन, देवीची प्रतिष्ठापना, घटस्थापना, पुजा, आरती. सायं. ७:०० वा. कुर्लादेवी प्रा.भजन मंडळ नवीन कुर्ली बुवा अमित दळवी याचे भजन,आरती. रात्री. ८:०० वा. ओम गणेश महिला मंडळ घोणसरी यांची फुगडी,रात्री ९:०० वा. दांडिया नृत्य. सोमवार दि.१२ ऑक्टो. सायं. ७:०० वा. ह.भ. प. विजय नारायण मेस्त्री यांचा हरिपाठ, रात्री ९:०० वा. दांडिया नृत्य, मंगळवार दि.१३ ऑक्टो. सांय. ७:०० वा. श्री लिंगेश्वर पावनादेवी प्रा. भजन मंडळ वाघेरी बुवा सचिन राणे यांचे भजन, रात्री ९:०० वा. दांडिया नृत्य. बुधवार दि.१४ ऑक्टो. स. ९:०० वा. रक्तदान शिबिर, सायं. ७:०० वा. श्री देव रवळनाथ प्रा. भजन मंडळ फोंडाघाट बुवा साहिल पारकर यांचे भजन, रात्री ९:०० वा. दांडिया नृत्य, गुरुवार दि.१५ ऑक्टो. सायं. ४:०० वा. हळदीकुंकू, सायं. ७:०० वा. श्री कुर्लादेवी प्रा. महिला भजन मंडळ बुवा कविता चव्हाण यांचे भजन, रात्री ९:०० वा. खेळ पैठणीचा, शुक्रवार दि.१६ ऑक्टो. दु.१२:३० वा. देवीचा महाप्रसाद, सायं. ७:०० वा. ओमकार प्रा. भजन मंडळ, गांगोवाडी बुवा मारुती मेस्त्री यांचे भजन, रात्री ८:३० वा. फुगडी- समई नृत्य(बोर्डवे, सुंदरवाडी), रात्री ९:३० वा. दांडिया नृत्य, याप्रमाणे होईल.

शनिवार दि.१७ ऑक्टो. सायं. ७:०० वा. केळोबा प्रा. भजन मंडळ, झर्येवाडी बुवा ऋषिकेश धुरी यांचे भजन, रात्री ८:३० वा. ह. भ. प. श्वेता सिद्धेश मेस्त्री कसाल यांचे कीर्तन रात्रौ. ९:३० वा. दांडिया नृत्य. रविवार दि.१८ ऑक्टो. सायं. ७:०० वा. श्री पावनादेव प्रा. भजन मंडळ बुवा हेमंत तेली यांचे भजन रात्रौ. ९:०० वा. रेकॉर्ड डान्स आणि वेशभूषा स्पर्धा, सोमवार दि.१९ ऑक्टो. सायं. ५:३० वा. रंगभरण व निबंध स्पर्धा, सायं. ७:०० वा. बालमित्र प्रा. भजन मंडळ, फोंडा बुवा मिलिंद मेस्त्री यांचे भजन रात्री. ९:०० वा. डबलबारी भजनाचा जंगी सामना श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ बुवा सुशांत जोईल x श्री पडेलकर प्रासादिक भजन मंडळ बुवा अखिलेश फाळके, मंगळवार दि.२० ऑक्टो. सायं. ५:०० वा. सोने लुटणे सायं. ०७:३० वा. श्री मेजारेश्वर प्रा. भजन मंडळ, नागवे बुवा अमेय आर्डेकर यांचे भजन, रात्रौ. ९:०० वा. दांडिया नृत्य, रात्री १०:०० वा. बक्षिस वितरण सोहळा व आभार प्रदर्शन कार्यक्रम, बुधवार दि.२१ ऑक्टो. दुपारी ३:०० वा. देवीची उत्तरपुजा व देवीची आरती व सायं. ४:०० वा. भव्यदिव्य मिरवणुक सोहळा व देवीचे विर्सजन. तसेच युट्युबर साठी रील स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या सर्व कार्यक्रमांचा ग्रामस्थ व भाविक- भक्तांनी लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवुन सहकार्य करावे असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!