कट्टा येथे उद्या भव्य रक्तदान शिबिर

सहकार महर्षी कै.प्रा.डी.बी.ढोलम साहेब यांच्या पुण्यतिथीप्रित्यर्थ आभाळमाया ग्रुपचे आयोजन.

चौके (प्रतिनिधी) : उद्या रविवार दि.२९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते ३: ३० या वेळेत वराडकर हायस्कूल कट्टा येथे सहकार महर्षी कै. प्रा.डी.बी.ढोलम साहेब यांच्या पुण्यतिथीप्रित्यर्थ आभाळमाया ग्रुपतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तदान चळवळीचे पितामह भीष्म म्हणून ओळखले जाणारे प्रकाश तेंडोलकर सर हे सुद्धा उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

त्याचप्रमाणे रॉयल मालवणी ग्रुप सिंधुदुर्ग यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचेही आयोजन यावेळी करण्यात आले आहे.

आभाळमाया ग्रुप, स्मिता कॉम्प्युटर एज्युकेशन, वराडकर हायस्कुल कट्टा आणि जी. एच. फिटनेस कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांनी केले आहे.

error: Content is protected !!