खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने सध्या सर्वत्र सेवा संकल्प अभियान कार्यक्रम राबविण्यात येत असून यानिमित्ताने खारेपाटण पंचशील नगर येथील अंगणवाडी केंद्रात नुकताच “आंगण का मेला हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य किरण कर्ले, महिला बचत गटाच्या सी. टी. सी – आस्था पाटणकर, खारेपाटण पंचशील नगर अंगणवाडी सेविका सविता पाटणकर, रामेश्वर नगर अंगणवाडी सेविका प्रतीक्षा ढेकणे, संभाजीनगर टाकेवाडी गुरववाडी अंगणवाडी सेविका निशा ब्रम्हदंडे, काझीवाडा अंगणवाडी सेविका रुक्साना सारंग, बंदरवाडी अंगणवाडी सेविका तरन्नुम ठाकूर, हसोळ टेंब कोंडवाडी अंगणवाडी सेविका शीतल कापसे, शिवाजीपेठ अंगणवाडी सेविका निकिता राऊत, तसेच मदतनीस आणि महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अंगणवाडी सेविकांच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर सेवा सप्ताहाच्या निमित्ताने उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जि. प सदस्य प्राची ईसवलकर व सरपंच महेंद्र गुरव यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष असा सत्कार करण्यात आला.तसेच उपस्थित सर्व अंगणवाडीतील मुलांना गोड खाऊ वाटप देखील करण्यात आले.
सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या “आंगण का मेला कार्यक्रमात महिला बालकल्यान विभागाच्या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे आणि त्यातून बालकांचा विकास घडविणे हा या आंगण का मेला उपक्रमाचा उद्देश असून यामध्ये सर्व अंगणवाडी सेविकांनी सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे असे आवाहन यावेळी जि. प. सदस्य प्राची ईसवलकर यांनी उपस्थित महिला वर्ग आणि अंगणवाडी सेविका यांना मार्गदर्शन करताना काढले.











