देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील वाडा-परबवाडी येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिरात प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी ‘नवरात्री उत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रेलचेलसह साजरा होणार आहे. ११ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भजनांचे जंगी सामने, महिलांचे कार्यक्रम, शक्ती-तुरा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा अशा विविधरंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवातील प्रमुख कार्यक्रम रविवार, ११ ऑक्टोबर (रात्री ८.०० वा.) श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ (वाडा घाडीवाडी) – बुवा अनिल घाडी यांचे सुश्राव्य भजन. सोमवार, १२ ऑक्टोबर (रात्री ८.०० वा.) श्री विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळ (वाडा-गुरववाडी) यांचे सुश्राव्य भजन. मंगळवार, १३ ऑक्टोबर (रात्री ८.०० वा.) सामने-सामने डबलबारी भजनांचा जंगी सामना, श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ (नाडण-देवगड) चे बुवा संदीप पुजारे विरुद्ध श्री हनुमान प्रा. भजन मंडळ (वर्दे-पेडणेकर) चे बुवा श्री. गुंडू सावंत, बुधवार, १४ ऑक्टोबर (सायंकाळी ६.०० वा.) ब्राह्मणवाडी महिला मंडळ (वाडा) यांचे सुश्राव्य भजन, गुरुवार, १५ ऑक्टोबर – ललिता पंचमी विशेष (रात्री ९.०० वा.),खेडची वाघीण आणि रायगडचा वाघ’ यांचा ललिता पंचमीनिमित्त विशेष ‘शक्ती-तुरा’ कार्यक्रम! शाहीर वैदेही शेलार (चिंचवली शेलारवाडी, खेड) आणि शाहीर रत्नाकर महाकाळ (मुर्डे गोठलवाडी) यांच्यात शाहिरीचा बहारदार सामना रंगणार आहे. शुक्रवार, १६ ऑक्टोबर (सायंकाळी ६.०० वा. बुवा अविकांत देवळेकर यांचे सुश्राव्य भजन, शनिवार, १७ ऑक्टोबर सायंकाळी ५.०० वा.: महिलांसाठी विशेष ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ (सन्मान नारी शक्तीचा). या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेता विक्रांत खातू करणार आहेत. रात्री ८.०० वा.: श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ (नाडण) – बुवा विजय पुजारे यांचे सुश्राव्य भजन, रविवार, १८ ऑक्टोबर (रात्री ८.०० वा.) श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ (नाडण) – बुवा आनंद (आबा) जोशी यांचे सुश्राव्य भजन, सोमवार, १९ ऑक्टोबर (रात्री ८.०० वा.) डबलबारी भजनांचा जंगी सामना श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ (पुरळ हुर्शी-देवगड) च्या बुवा साची मुळम विरुद्ध श्री प्रासादिक भजन मंडळ (नाडण-देवगड) च्या बुवा किर्ती पुजारे. 20 ऑक्टोंबर रोजी सोने लुटून दसऱ्याची सांगता होणार आहे.
श्री महालक्ष्मी मंदिरातील सर्व धार्मिक, सांस्कृतिक व भक्तीमय कार्यक्रमांचा लाभ सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापन व श्री महालक्ष्मी उत्सव समितीच्या वतीने व परत कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.
फोटो- श्री महालक्ष्मी फोटो











