गुटखा विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला जामीन

कणकवली (प्रतिनिधी) : प्रतिबंधीत अन्नपदार्थाचा (गुटखा) साठा आढळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या केतन राजेंद्र देऊलकर (२८) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीतर्फे अॅड. अग्निवेश तावडे व अॅड. आर्यन तावडे यांनी न्यायालयात बाजू मांडली.

अन्न सुरक्षा अधिकारी तेजश्री ताजणे यांनी १ ऑक्टोबर रोजी दुपारी जानवली पुलानजीक केतन राजेंद्र देऊलकर (२८, तरंदळे – कुंदेवाडी) याच्या पान टपरीत छापा टाकून गुटखा जप्त केला होता. हा गुटखा त्याने सतीश उर्फ शक्ती देवर (रा. वरवडे) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. श्रीमती ताजणे यांच्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलमांनुसार गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी केतन देऊलकर याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या जामिनासाठी अॅड. अग्निवेश तावडे व अॅड. आर्यन तावडे या बंधूंनी केलेल्या युक्तिवादानंतर जामीन मंजूर करण्यात आला. याप्रकरणातील सतीश देवर हा दुसरा आरोपी पसार आहे.

error: Content is protected !!