खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजला शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राबविलेल्या ‘चला शाळेकडे जाऊया’ या उपक्रमाची सुरुवात खारेपाटण सारख्या ग्रामीण भागातील शाळेत यापूर्वीपासूनच सुरू असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान असून, या शाळेच्या शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे व ग्रामस्थांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे कौतुकपूर्ण उद्गार महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री श्री. दादा भुसे यांनी शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण च्या भेटीदरम्यान काढले.

शिक्षणमंत्री नामदार दादासाहेब भुसे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी बुधवार दि. ०७ रोजी संध्याकाळी प्रशालेला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना उपनेते संजय आंग्रे,कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल,कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव उपस्थित होते.

यावेळी शेठ न.म.विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सन्मान करण्यात आला.यावेळी संस्थेचे सचिव महेश कोळसुलकर विश्वस्त राजू वरूणकर, ए. डी कांबळे सर, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.

या भेटीदरम्यान मंत्री दादासाहेब भुसे यांनी शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य व शिक्षक यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. यावेळी बोलताना ग्रामीण भागामध्ये १००० विद्यार्थी संख्या असणाऱ्या खारेपाटण हायस्कूल चे व संस्थेचे विशेष कौतुक केले. मंत्री दादा भुसे म्हणाले की, शाळांनी आवश्यक असणारी मदत प्रशासनाकडून केली जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा आदर्शवत होण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल. शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेजसारख्या शाळांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमामुळे शेठ एन. एम. विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक कार्याला आणि शिक्षक-विद्यार्थ्यांच्या उत्साहाला नवी प्रेरणा मिळाली आहे.

error: Content is protected !!