खारेपाटणच्या शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांचा व्हॉलीबॉलमध्ये दमदार विजय

खारेपाटण (प्रतिनिधी) : कळसुली येथे झालेल्या तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी विजेतेपद व १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी नुकतेच उपविजेतेपद पटकावले. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशा बद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे व प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी अभिनंदन केले आहे.

क्रीडा क्षेत्रात आपल्या गुणवत्तेची छाप उमटविणाऱ्या शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण येथील विद्यार्थ्यांनी व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी सज्जता दर्शविली आहे. १७ वर्षांखालील मुलांच्या गटातील तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी विद्यालयाच्या खेळाडूंनी विजेतेपद मिळवत तालुक्यामध्ये प्रशालेचे नाव उंचावले आहे. विद्यालयातील या गुणवान खेळाडूंमध्ये अहमद रजा फैयाज पावसकर, साम्मेद अजित उपाध्ये, समर्थ प्रदीप लोकेरे, समर्थ बाळासाहेब जाधव, शिवम दिलीप तावडे, मयुरेश राजेंद्र दर्पे, मनप्रीत योगेश खोसला, प्रशांत किरसिंग पाडवी, प्रतीक संतोष धुळप, ओम विशाल कावळे, ओंकार संदीप सावंत आणि सार्थक संतोष जाधव यांचा समावेश आहे.

या खेळाडूंना क्रीडाशिक्षक किरसिंग रणजित पाडवी यांचे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन लाभत आहे, तर संघाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी प्रशालेतील शिक्षक रामदास भीमराव भिसे यांच्याकडे आहे. जिद्द, मेहनत आणि संघभावनेची ‘स्मॅश’ कामगिरी! व्हॉलीबॉलसारख्या सांघिक खेळामध्ये केवळ वैयक्तिक कौशल्य नव्हे, तर संघभावना, शिस्त, वेग, अचूकता आणि सातत्यपूर्ण सराव यांना विशेष महत्त्व असते. विद्यालयातील या खेळाडूंनी सरावाच्या माध्यमातून आपल्या खेळात सातत्याने सुधारणा करण्याचा प्रयत्न केला असून, पुढील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या दृष्टीने अशा स्पर्धांचे महत्त्व मोठे आहे. या खेळाडूंच्या निवडीमुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली असून, विद्यार्थ्यांमध्येही क्रीडाविषयक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सर्व खेळाडूंना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव महेश कोळसुलकर सर्व विश्वस्त, प्रशालेत चे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, प्रशालेतील शिक्षक व क्रीडाप्रेमींकडून अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!