वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेची विद्यार्थीनी दुर्वाक्षी फाटक जिल्ह्यात प्रथम

सेवा संकल्प अभियान अंतर्गत शिक्षण विभागाच्या माध्यमातून आयोजित चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले दुर्वाक्षी फाटक चे अभिनंदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दि.१७ सप्टेंबर २०२६ ते दि.१७ ऑक्टोबर २०२६ या काळात संपूर्ण राज्यात शालेय शिक्षण विभाग व सामान्य प्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात आले. या अंतर्गत “विकसित भारत २०४७” या विषयावर दि.५ ऑक्टोबर २०२६ रोजी संपुर्ण जिल्ह्यात शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल, कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी ची विद्यार्थिनी कु.दुर्वाक्षी दिपक फाटक हिने गट क्रमांक ४ इयत्ता ८ वी ते १० वी या गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिला प्रशालेचे कलाशिक्षक मंदार चोरगे यांनी मार्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले.

यावेळी मुख्याध्यापक भास्कर नादकर, शिक्षिका संगिता पाटील, कलाशिक्षक मंदार चोरगे, लिपिक स्वप्नील बावदाणे तसेच अन्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तिच्या या यशाबद्दल प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!