वक्तृत्व स्पर्धेसह व १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने पंचशील नगर खारेपाटण येथे आयोजित करण्यात आलेला ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दीन अर्थात अशोका विजया दशमी सन उस्ताहात साजरा करण्यात आला.
खारेपाटण पंचशील नगर, बुद्धविहार येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते पंचशील ध्वजारोहण करून करण्यात आली. तसेच येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला पंचशील विकास मंडळाचे अध्यक्ष भरत पाटणकर व संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा संकिता पाटणकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर येथील बुद्धविहारात बौद्धजन सेवा संघ खारेपाटण चे बौद्धचार्य संतोष मधुकर पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक त्रिसरण पंचशील बौद्ध धम्म पूजा पाठ घेण्यात आला.यामध्ये सर्व बौद्ध बांधवांनी सहभाग घेतला. यानंतर दिवं. प्रशांत यशवंत पाटणकर यांच्या स्मृती निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पंचशील नगर व सम्यक नगर येथील १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच या कार्यक्रमाला बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत कांबळे व त्यांचे पदाधिकारी यांनी भेट दिली. व येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी खारेपाटण केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे, नाणार इंगळवाडी प्राक्रमिक शाळेचे शिक्षक जोगदंड सर, प्रा.आ. केंद्र खारेपाटण चे आरोग्य सेवक मिथुन गेडाम, फणसगाव प्रा. आ. केंद्राचे आरोग्य सेवक संतोष जुवाटकर, ग्रामपंचायत कर्मचारी राजेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते कुणाल पवार, खारेपाटण ग्रा.पं.चे माजी सदस्य योगेश पाटणकर, युती पोमेडकर मंडळाचे ज्येष्ठ सभासद अशोक पाटणकर, प्रकाश हेटम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत कु.सांची संतोष पाटणकर हिने प्रथम क्रमांक मिळविला. तर कु.मनस्वी संतोष जुवाटकर हिने द्वितीय तर कु.शौर्य महेंद्र पवार याने तृतीय क्रमांक मिळविला. यानंतर सायंकाळी पंचाधील नगर येथील लहान मुले, महिला, पुरुष करीता विविध फनी गेम स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील सर्व विजेत्याना मंडळाच्या वतीने बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त मिलिंद सरकटे सर, संतोष पाटणकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. तर कुणाला पवार, योगेश पाटणकर, आस्था पाटणकर, भरत पाटणकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते संदेश पाटणकर, धीरज जुमलेकर, अमित पाटणकर, संदीप पाटणकर, कुणाल पाटणकर, श्रवण पाटणकर, मकरंद पाटणकर, ललित पाटणकर यांनी परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मंडळाचे सचिव सागर पोमेडकर यांनी केले.












