सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सहाय्यक संचालक वित्त व लेखा वर्ग-1 पदी निवड झालेल्या तृप्ती कृष्णा टेमकर हिचा जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी पुष्पगुच्छ आणि पुस्तक भेट देवून सत्कार केला.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात हवालदार पदावर काम करणारे कृष्णा टेमकर यांची ती कन्या आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज सत्कार करुन शुभेच्छा दिल्या यावेळी वडील कृष्णा टेमकर, बंधू अनंत टेमकर, स्थानिक निधी कार्यालयाचे लेखाधिकारी पांडुरंग थोरात आदी उपस्थित होते.