Jio च्या विस्कळित सेवेमुळे हॅलो.. हॅलो म्हणता म्हणता ग्राहकांचा जीव कासावीस
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून जिओ मोबाईल ची सेवा विस्कळित झाली आहे. जिओ च्या नेटवर्क च्या समस्येमुळे हॅलो.. हॅलो.. म्हणता म्हणता ग्राहकांचा जीव कासावीस झाला आहे. वाढलेल्या रिचार्ज दरात पुन्हा दोन- तिनं दिवस नेटवर्क समस्या म्हणजे दूष्काळात तेरावा महिना यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागत आहे. वाढता उन्हाचा पारा त्यात मोबाईल नेटवर्क समस्या यामुळे ग्राहकांची चिडचिड होताना दिसत आहे. ग्राहकांकडून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.