शासन आपल्या दारी चा कणकवलीत नागरिकांना थेट फायदा

आमदार नितेश राणेंच्या हस्ते उदघाटन

कणकवली (प्रतिनिधी): कणकवलीत शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने “शासन आपल्या दारी” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरीय शासन आपल्या दारी हा कार्यक्रम १ जून रोजी येथील भगवती हॉलमध्ये आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी कृषी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. कणकवली तालुकास्तरीय शासन आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ आ. नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसिलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मुख्याधिकारी अवधूत तावडे, माजी सभापती तुळशीदास रावराणे, मनोज रावराणे, भाग्यलक्ष्मी साटम, बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील, तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रणोती इंगवले, कृषी अधिकारी सुभाष पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एम. एन. चौगुले, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, विस्तार अधिकारी सुर्यकांत वारंग व इतर उपस्थित होते. शासनाचे महसूल, पुरवठा, पोलीस, नगरपंचायत, बांधकाम, कृषी, पशुंवर्धन, आरोग्य, शिक्षण, आरोग्य, आधार, पंचायत समिती आदींसह सर्वच विभाग व अधिकारी एकाच छत्राखाली उपस्थित होते. त्यामुळे नागरीकांना विविध योजनांची माहिती व १३ हजार ४५६ नागरिकांपैकी प्रातिनिधिक ७५ लोकांना लाभ देण्यात आला आहे. या कराजारमाचे सूत्रसंचालन श्याम सावंत यांनी केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!