कुंभवडे शिंदेवाडी येथील घराचे छप्पर कोसळून नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कुंभवडे शिंदेवाडी येथील जयंत रामचंद्र शिंदे यांच्या घराचे छप्पर कोसळून मोठे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी रात्रीच्यावेळी घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

वैभववाडी तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून दररोज विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. या पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान होत आहे. तर कुंभवडे येथील शिंदे यांच्या घराचे नुकसान झाले आहे. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!