विषारी द्रव्य प्राशन केलेल्या लोरे नं २ येथील वेदिका वाडेकर चा उपचारदरम्यान मृत्यू

वैभववाडी (प्रतिनिधी) : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या लोरे नं २ येथील वेदिका विजय वाडेकर वय २१ या तरुणीचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. 3 ऑक्टोबर रोजी तिने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले होते. याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

सदर तरुणीने ३ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता लोरे येथे राहत्या घरी ग्रामोफोन हे विषारी द्रव्य घेतले होते. तिला अत्यावस्त स्थितीत कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून ५ ऑक्टोबर रोजी अधिक उपचाराकरिता तिला कोल्हापूर येथील खाजगी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. मात्र तिथेही तिची तब्येत खालवल्यामुळे तिला १० ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथील सी पी आर या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इथे उपचार सुरू असतानाच सोमवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास तिचे निधन झाले.

या घटनेची कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातून हे प्रकरण वैभववाडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. या युवतीने विषारी द्रव्य प्राशन का केले या बाबत पोलीस तपास करीत आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार धनाजी धडे करीत आहेत.

error: Content is protected !!