आला पावसाळा ..बस्ती पंचकर्म चिकित्से ने तब्बेत सांभाळा

माधवबागच्या वतीने स्पेशल वर्षाऋतु ऑफर.. बस्ती पंचकर्म चिकित्सा फक्त 599 रु.

कणकवली (प्रतिनिधी): पावसाळ्यात आपल्या तब्बेतीची सर्वांनीच काळजी घेणे अत्यावश्यक आहे. यासाठीच माधवबागच्या वतीने स्पेशल वर्षाऋतु ऑफर देण्यात आली असून निरोगी आरोग्यासाठी बस्ती पंचकर्म चिकित्सा शिबीर २ जून पासून 30 जून पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. वात दोष आढळल्याने होणारे आजार, संधिवात, पोट साफ न होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, अंगदुखी, जडपणा, स्थूलपणा, भूक न लागणे, मणक्याचे विकार, सांधेदुखी, कंबरदुखी, मानेचे विकार, आदी आजारांत बस्ती पंचकर्म केल्यामुळे फायदा होतो. 850 रु. ऐवजी केवळ 599 रुपयांत बस्ती पंचकर्म चिकित्सा माधवबाग च्या वतीने केली जाणार आहे. यासाठी नावनोंदणी आवश्यक असून कणकवली मोबा.9373183888 , कुडाळ मोबा. 9011328581, सावंतवाडी मोबा. 7774028185 येथे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!