खुद्द जिल्हाधिकारी, जि. प.सीईओ नि पकडली अवैध दारू वाहतूक

इन्सुली चेकपोस्टवर बलेरो पिकअप सह १७ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी अनिल पाटील,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी इन्सुली सीमा तपासणी नाका येथे अचानक भेट देत पाहणी करत वाहन तपासणी करीत असताना गोवा राज्यातून महाराष्ट्र राज्यात येणारे बोलेरो पिकअप वाहन तपासणीसाठी थांबविले असता बॉटल सील असलेले वाहन व वाहनासोबत असलेली बिल्टी यामध्ये तफावत आढळल्याने वाहनाचे बॉटल सील तोडले असता त्यामध्ये गोवा राज्यनिर्मित उच्च प्रतीचे विदेशी मदयाचे ५० बॉक्स मिळून आले. वाहनासहीत मिळून आलेल्या मदयाची अंदाजे किंमत रु. १७,१५,९००/- किंमतीचा मुदेदमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पिकअप चालक वलेरियाने सेबस्तियानो ब्रगंजा रा. ऐरोली मुंबई यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (अ, ई) व ९० अन्वये ताब्यात घेतले आहे. सदर कारवाईवेळी मनोज शेवरे,अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग हे उपस्थित असून इन्सुली तपासणी नाक्यावरील अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित आहेत.

सदर गुन्हयाचा पुढील तपास प्रदीप रास्कर, दुय्यम निरीक्षक करीत आहेत.

error: Content is protected !!