भाजपा वेंगुर्लेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच श्री शिवराज्याभिषेक दिन! हिंदवी स्वराज्यात या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे कारण याच दिवशी इतिहासात शिवरायांना न भूतो न भविष्यती असा राज्याभिषेक किल्ले रायगडावर झाला आणि रयतेचा राजा छत्रपती झाला.ही घटना इतिहासात सुवर्णक्षरात कोरली गेली.या दैदिप्यमान सोहळ्याला ३५० वर्षे झाली. म्हणूनच चालू वर्ष हे शासनातर्फे शिवराज्याभिषेक शक म्हणून जाहीर करण्यात आलेल आहे. शिवशाहीचा जागर करण्यासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम शासनातर्फे आयोजित करण्यात आलेले आहेत.

दर वर्षी प्रमाणे याही वर्षी दि.२ जुन रोजी तिथी प्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर होत आहे . विशेषकरून या वर्षीच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याने भव्यदिव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे . तसेच या वेळेचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा तब्बल ३५० वा ऐतिहासिक सोहळा असल्याने या सोहळ्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे . वेंगुर्लेत ही भाजपाच्या वतीने तालुका कार्यालयात छत्रपति शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस नगराध्यक्ष राजन गिरप व वसंत तांडेल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . तसेच माणिकचौक येथील शिवछत्रपंतींच्या पुतळ्यास तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला .

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर , किसान मोर्चाचे प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु , युवा मोर्चाचे संदिप पाटील , नगरसेवक नागेश उर्फ पिंटु गावडे , शक्तीकेंद्र प्रमुख शामसुंदर मुननकर , परबवाडा उपसरपंच पपु परब , बूथ अध्यक्ष रवींद्र शिरसाठ व पुंडलिक हळदणकर व नितिश कुडतरकर , माजी सरपंच सूर्यकांत परब , ओंकार चव्हाण , दिलीप मालवणकर इत्यांदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!