कुडाळमध्ये वाढलेल्या चोऱ्यांच्या घटनांबाबत कुडाळवासियांनी पोलिस प्रशासनाचे वेधले लक्ष

कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ शहरात वाढलेले चोऱ्यांचे प्रमाण, ट्रॅफिक समस्या याबाबत गुरुवारी १ जून रोजी कुडाळवासियांनी कुडाळचे पोलिस निरीक्षक शंकर चिंदरकर यांचे लक्ष वेधले. यामध्ये प्रामुख्याने कुडाळ शहरात वाढलेले चोरींचे प्रमाण, ट्रॅफिक समस्या याबाबत कुडाळ पोलिस निरीक्षकांशी चर्चा केली. यामध्ये कुडाळ रेल्वेस्टेशन, काळप नाका या परिसरात पोलिस प्रशासनाने सतर्कता बाळगावी, तसेच रात्रीची पोलीस गस्त वाढवावी याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कुडाळ शहरातील मालवण मार्गाच्या बाजूला असलेल्या स्टॉल्सवर कारवाई करून ट्रॅफिक समस्या दूर करावी, अशी मागणी सुद्धा करण्यात आली. राऊळ महाराज कॉलेज चौक, कुडाळ गांधी चौक, जिजामाता चौक ते छत्रपती शिवाजीनगर येथे होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करावी, अशा सूचना करण्यात आल्या. तसेच एमआयडीसी येथून जाणाऱ्या भंगार व्यावसायिकांवर लक्ष देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.यावेळी सुनील भोगटे, द्वारकानाथ घुर्ये, व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट, काका कुडाळकर, प्रसाद शिरसाट आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!