कणकवली नगरपंचायतचे रहिवाशी दाखले देण्याचा चार्ज दिलेल्या कलमठ पोलीस पाटील यांना नगरपंचायत किंवा तहसील कार्यालयात बसवा

माजी नगरसेवक सुशांत नाईक, व कन्हैया पारकर यांची नगरपंचायत प्रशासकांकडे मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यांसाठी लागणारे कणकवली नगरपंचायतीचे रहिवाशी दाखले देण्यासाठीचा चार्ज कलमठ पोलीस पाटील यांना देण्यात आला आहे. मात्र सदर रहिवाशी दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थांना कलमठ मध्ये जावे लागणार आहे.त्यामुळे याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याने आज शिवसेनेचे माजी नगरसेवक सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांनी कणकवली नगरपंचायतीचे प्रशासक तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेऊन याविषयावर तोडगा काढण्याबाबत चर्चा केली. विद्यार्थ्यांना रहिवाशी दाखले सुलभ रित्या मिळण्यासाठी कलमठ पोलीस पाटील यांना कणकवली नगरपंचायत कार्यालय किंवा कणकवली तहसील कार्यालय येथे बसण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांनी जगदीश कातकर यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!