नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे – खारेपाटण हायस्कूल चा १०० % निकाल


शुभंकर सुधीर कुबल ९४.८० % गुण मिळवून प्रथम


खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण – नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे या इंग्रजी माध्यम शाळेचा दहावी बोर्ड परीक्षेचा रिझल्ट १०० % लागला असून शुभंकर सुधीर कुबल हा विद्यार्थी ९४.८० % गुण मिळवित शाळेत प्रथम आला आहे.
शाळेच्या या १०० % निकालाच्या यशाबद्दल व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
आदर्श एज्युकेशन सोसायटी खारेपाटण संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे खारेपाटण या इंग्रजी माध्यम शाळेचा दरवर्षी १०० % निकालाची परंपरा कायम राखली असून मार्च २०२३ दहावी बोर्ड परीक्षेत अनुक्रमे उत्तीर्ण झालेले शाळेचे विद्यार्थी पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक – शुभंकर सुधीर कुबल (९४.८० %) द्वितीय – प्रनील राजेश शिंदे (९०.४० %) तृतीय – कु.निशा संदीप रायका (८७.६० %) व अहमद अजमद मुकादम (८७.६० %) या दोन्ही विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल चे चेअरमन श्री मनोज गुळेकर,सेक्रेटरी मोहन कावळे तसेच प्रिन्सिपॉल कौस्तुभ देसाई समन्वयक श्री पराग शंक्ररदास यांसह संचालक मण्डल सदस्य व शिक्षक व शि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.


error: Content is protected !!