सिंधुदुर्ग डान्सींग सुपरस्टार स्पर्धा ४ जूनपासून कुडाळमध्ये

रिॲलिटी शो च्या धर्तीवर सिंधुदुर्गातील सर्वात मोठी स्पर्धा

चिमणी पाखरं डान्स क्लास ॲकॅडमीचे आयोजन

कुडाळ (अमोल गोसावी) : चिमणी पाखरं डान्स क्लास ॲकॅडमी कुडाळ आयोजित डान्सींग सुपरस्टार सीझन ४ ही रिॲलिटी शोच्या धर्तीवर सिंधुदुर्गातील सर्वात मोठी डान्स स्पर्धा ४ जून पासून कुडाळ येथे सुरु होत आहे. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील नामांकित आणि नेहमी स्पर्धेत सहभागी असणाऱ्या कलाकारांना सहभाग न देता फक्त नविन नृत्य स्पर्धकांना संधी दिली जाणार आहे हे या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. जेणेकरून जिल्ह्यातील नविन टॅलेंट समोर येउन त्यांना वाव मिळावा हा आयोजक तथा चिमणी पाखरं डान्स क्लास ॲकॅडमीचे संचालक कोरिओग्राफर श्री रवी कुडाळकर यांचा प्रमुख उद्देश आहे. या स्पर्धेचे उद्घाटन रविवार दिनांक ४ जून रोजी सकाळी ९ : ३० वाजता मराठा समाज हॉल येथे श्री सुनिल भोगटे , श्री. जितेंद्र सावंत , श्री. विजय सावंत , कृष्णा धुरी , कान्हा केसरकर , प्रमोद नाईक , उमेश वेंगुर्लेकर, सतिश पावसकर या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!