उद्योजक सुकांत वरुणकर यांची युवासेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

उद्योगमंत्री उदय सामंत, लोकसभा संपर्कप्रमुख आ.रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ): खारेपाटण येथील युवा उद्योजक सुकांत वरुणकर यांनी आज उद्योगमंत्री उदय सामंत ,लोकसभा संपर्कप्रमुख आ.रवींद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या सुकांत वरूणकर यांची युवासेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस वर सुकांत यांनी धनुष्यबाण हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, अशोक दळवी, संदेश सावंत, सुनील पारकर, शेखर राणे, बबन शिंदे, किसन मांजरेकर आदी उपस्थित होते. उद्योजक सुकांत वरुणकर हा खारेपाटण दशक्रोशीत सामाजिक शैक्षणिक क्रीडा आरोग्य धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणारे उद्योजक व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नसलेले सुकांत यांनी आता राजकीय पटलावर पाऊल ठेवत शिसवेनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीचा शुभारंभ केला आहे. शिवसेना संघटना वाढविणे आणि जनतेच्या हिताची कामे मुख्यमंत्री शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, लोकसभा संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक आणि पक्षनेतृत्वाच्या माध्यमातून करणार असल्याचे यावेळी सुकांत वरुणकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!