मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील डिकवल येथे शिवस्वप्न बायोफ्युएल्स प्रायव्हेट लि. मालवण व शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनी लि.मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील प्रस्तावित बायोकोल (m-COAL) युनिटचा भूमिपूजन सोहळा कार्तिक रावल (National Prime BDA – MCL) यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी कार्तिक रावल यांनी उपस्थितांना MCL व m -COAL संबंधी विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मालवण तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला जोडले जाऊन आपल्या तालुक्याला सुजलाम-सुफलाम बनविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी शिवस्वप्न कंपनीला शुभेच्छा देताना मालवण मधील शिवस्वप्न कंपनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील महाराष्ट्र बनविण्याचे काम करत असल्याचे गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमाप्रसंगी रमेश पाटील (Senior BDA-MCL) यांनी MCL चे कार्य, व्हिजन, मिशन याबद्दल मार्गदर्शन केले. शिवस्वप्न कंपनीच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सागर सांगेलकर यांनी MCL च्या माध्यमातून m-COAL युनिट चे महत्व, भविष्यातील रोजगाराच्या संधी व पुढील कालावधीतील विकासात्मक प्रकल्पांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी निखिल ढोकरे, स्वप्नील तेजम , हरिहर मयेकर, व इतर जिल्ह्यातील एमपीओचे संचालक उपस्थित होते. यावेळी माजी जि.प.सदस्य अनिल कांदळकर, ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल चे सरपंच सुभाष लाड, उपसरपंच साबाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य, गावकर मंडळी, पंचक्रोशीतील मान्यवर, शेतकरी, महिला तसेच शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मंडळ, ग्रामोद्योजक,गावप्रतिनिधी, चॅनेल पार्टनर व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जमीनमालक श्रीकृष्ण तेली, अनिल तेली यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला गावातील लोकांनी उस्फुर्त सहभाग दर्शविला व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी मदत केली.