प्रजासत्ताक दिनी करण्यात आला शुभारंभ
कणकवली (प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचेने नुसार दिलेल्या १० संकल्पांपैकी ४ संकल्पांवर प्रत्येक ग्रामपंचायतने उपक्रमांचे नियोजन करायचे असून त्यासाठी १५ वा वित्त आयोग मधून नियोजन करताना, कलमठ ग्रामपंचायतने बालस्नेही गाव, महिला स्नेही गाव, स्वच्छ व हरित गाव आणी जलसमृद्ध गाव या ४ संकल्पांची निवड केली आहे. या संकल्पांचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनानिमित्त कलमठ ग्रामपंचायत कार्यालय समोर करण्यात आला. त्या साठि अनेक उपक्रम नियोजित असून बालस्नेही,महिला स्नेही या संकल्पां मधून कलमठ गावातिल विद्यार्थी व महिलांसाठी शैक्षणिक, आरोग्य ,कृषि, महिला सबलीकरण यावर अनेक अनेक उपक्रम हाती घेणार असून त्या साठि योग्य नियोजन कंरणार असल्याचे यावेळी संदिप मेस्त्री यांनी सांगितले. प्रजासत्ताकदीनी कलमठ ग्रामपंचायत समोर फलक प्रसारित करून या संकल्पांचा शुभारंभ झाला. यावेळी कलमठ सरपंच संदिप मेस्त्री, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुड़तरकर, सदस्य दिनेश गोठणकर, स्वाति नारकर, श्रेयस चिंदरकर,इफत शेख, पपू यादव,नितिन पवार,सुप्रिया मेस्त्री,अनूप वारंग,हेलन कांबळे,सचिन खोचरे, मुख्याध्यापक, आरोग्य अधिकारी, अंगणवाड़ी सेविका,कृषि अधिकारी, महिला ग्रामसंघ व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.