सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : डोक्यात चिऱ्याने ठेचून ठार मारल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी अजित रामा सावंत ( रा.ओवळीये, सावंतवाडी ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. आरोपी अजित सावंत याने ओवळीये, ता सावंतवाडी येथील लवू रामा सावंत याचा डोक्यात चिरा दगड घालून खून केला होता. खुनाची घटना 30 एप्रिल 2023 रोजी घडली होती.या गुन्ह्यात आरोपी अजित सावंत याला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली होती. सध्या न्यायालयिन कोठडीत असलेल्या अजित सावंत याने सादर केलेल्या जामीन अर्जाला सरकारी वकील देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयासमोर मांडून हरकत घेतली. आरोपीचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग होता, आरोपीने पोलीस कोठडीत असताना तपासकामी सहकार्य केलेलं नाही,जामीन मिळाल्यास आरोपी भूमिगत होऊन केस च्या सुनावणीसाठी गैरहजर राहण्याची शक्यता आहे, साक्षीदारांवर दबाव अनु शकतो . सरकारी वकील देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायालयाने आरोपी अजित सावंत चा जामीन अर्ज नामंजूर केला.