एक्सोन कंपनीच्या इंजिनिअरला अज्ञात इसमांकडून हॉकी स्टिक, बॅट, दांड्याने बेदम मारहाण

दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दोडामार्ग (प्रतिनिधी) : सासोली येथील एक्सोन कंपनी चे सिव्हिल इंजिनिअर नसरुद्दीन मोहम्मद रेहान बेग (वय 47 ,मूळ रा. गौतम बुद्ध नगर उत्तर प्रदेश) यांना सहा अज्ञात इसमानी बेस बॉल बॅट, हॉकी स्टिक, व दांड्याने बेदम मारहाण केली. 27 एप्रिल रोजी दुपारी 3 : 30 वाजता एक्सोन कंपनी ओरिजन सासोली च्या प्लांट वर घडली. नसरुद्दीन हे प्लांटवर कामाची पाहणी करत असताना अज्ञात 6 जणांनी त्यांना दोन्ही हात, पाय, डोके आणि डोळयांना बेदम मारहाण केली. याबाबतची फिर्याद नसरुद्दीन यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात 28 एप्रिल रोजी दिली असून मारहाण करणाऱ्या 6 जणांवर आयपीसी कलम 141, 143, 147, 149, 326, 324, 323, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भगत करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!