आपला सिंधुदुर्ग न्यूज इम्पॅक्ट! संकलित मुल्यमापन चाचणी१ चे पेपर युट्यूबवरुन हटवले

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात आली दखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने ‘STARS’ प्रकल्पांतर्गत इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित व इंग्रजी या विषयांसाठी दरवर्षी संकलित मुल्यमापन चाचणीचे आयोजन करण्यात येते. सहामाही परीक्षेच्या काळात असलेल्या या तिन विषयांचे परिक्षांचे गुण अनेक शाळा सहामाही तसेच वार्षिक परिक्षेच्या निकालात समाविष्ट करुन निकाल तयार करतात.
काल संपूर्ण राज्यात या परिक्षेस सुरवात झाली आहे. दि.२२ रोजी मराठी, दि.२३ रोजी इंग्रजी व दि.२४ रोजी गणित विषयांचे संकलित मुल्यमापन चाचणीचे आयोजन संपुर्ण राज्यात शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या परिक्षेच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपुर्वीच दोन दिवस आधीपासून Y.C. Education MH या युट्यूब चॅनल वर प्रसारित झाल्या होत्या. यासंबंधीचे वृत्त आपला सिंधुदुर्ग न्युज चॅनलच्या वतीने काल प्रसारित करण्यात आले होते त्याची तात्काळ दखल घेत राज्य मंडळाच्या वतीने या युट्यूब चॅनल वरुन त्या प्रश्न पत्रिकांचे व्हिडिओ हटविण्यात आले आहेत. यापुढे देखील परिक्षा या सदोष व गोपनीयता राखुन पार पाडाव्यात अशी अपेक्षा शिक्षक व पालक यांच्याकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!