कणकवली (प्रतिनिधी): ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कणकवली तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष हनिफ पीरखान यांची कार्याध्यक्षपदी आणि संजना सदडेकर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर सचिव म्हणून मनोजकुमार वारे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक व जिल्हाध्यक्ष मनोज तोरसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली होती. या बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात येऊन ती राज्य कार्यकारिणीकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आली होती. राज्य संघटनेच्या मंजूरीनंतर कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
कणकवली तालुक्याची नव्याने निवडण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे- कार्याध्यक्ष- हनिप पीरखान, तालुका अध्यक्षपदी – संजना सदडेकर तर उपाध्यक्ष – भूषण शेट्ये, उपाध्यक्ष- सदाशिव राणे आणि सचिव म्हणून मनोजकुमार वारे तसेच संघटक म्हणून – ऋषिकेश कोरडे, निरीक्षक- प्रवीण गायकवाड आणि महिला संघटक म्हणून सौ. श्रावणी मदभावे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कटारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर तसेच महाराष्ट्र राज्य सचिव राकेश शिंदे व राज्य निरीक्षक घन: श्याम सांडीम यांच्या मार्गदर्शना नुसार कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष मनोज तोरसकर यांनी कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर केली.