स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडेच्या माध्यमातून राबविण्यात आला सामाजिक उपक्रम
कणकवली (प्रतिनिधी): वरवडे गावचे सुपुत्र तथा स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे सल्लागार समिती सदस्य उद्योजक अचित सूर्यकांत कदम यांच्या सौजन्याने वरवडे गावातील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद च्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले . विद्यार्थ्यांना आवश्यक वह्या, पेन, खोडरबर पेन्सिल आदी शालोपयोगी वस्तूंचा संच 125 हुन अधिक विद्यार्थ्यांना सरपंच करुणा घाडीगांवकर, स्वाभिमान प्रतिष्ठान चे अध्यक्ष कान्हा मालंडकर, उद्योजक अचित कदम यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. यावेळी इब्राहिम शेख, काका कदम, आनंद घाडी, सुभाष मालंडकर, अंकिता घाडीगावकर, मानसी तेली, प्रभाकर देसाई, पोलीस पाटील प्रदीप सावंत, प्रकाश फर्नांडिस, नारायण बांदल, सलाउद्दीन कुडाळकर, संतोष चव्हाण, कृष्णा घाडीगावकर, विनायक घाडीगावकर, संदीप घाडी, सुधाकर विचारे, अशोक घाडी, शैलेश कदम, प्रदीप गावडे, सादिक शेख, राजू कुयेस्कर, तेजस कदम, साहिल गावडे, निलेश कदम, सागर गावडे, नितीन कदम, ओंकार कदम आदी मान्यवर उपस्थित होते. उद्योजक अचित कदम यांनी जपलेल्या सामाजिक बंधीलकीबद्दल शिक्षक वृंद तसेच पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.