कुडाळ (अमोल गोसावी ) : कवठी गावचे शिवसेना पदाधिकारी मंगेश बांदेकर यांनी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्या आदेशानुसार नेरूर येथे काजू युनिट व्यवसाय सुरु केला. या युनिटच्या शुभारंभाला आमदार वैभव नाईक बाहेरगावी असल्याने उपस्थित राहू शकले नव्हते. परंतु, नेरुर जि. प. मतदारसंघातील अनेक विकासकामांची भूमिपूजने करत असताना नेरुर येथील मंगेश बांदेकर यांच्या काजू युनिट व्यवसायाची पाहणी करत आमदार वैभव नाईक यांनी बांदेकर यांच्या नव्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, अभय शिरसाट, राजू गवंडे, संदीप म्हाडेश्वर, कवठी मा. सरपंच रुपेश वाड्येकर, कवठी उपसरपंच खडपकर, राजन खोबरेकर आणि बांदेकर कुटुबिय उपस्थित होते